Monday, September 10, 2012

जाण रे आत्मस्वरूप जाण ....


भक्ताला चार अवस्थांमधून जावे लागतेच. आर्त (तळमळीचा), जिज्ञासू, अर्थार्थी (मर्म जाणणारा) आणि ज्ञानी. आत्मतत्त्वाहून वेगळे जगात काही नाहीच. तू भक्त हो, भक्ती कर, ज्ञान मिळव.


जाण रे आत्मस्वरूप जाण ! ध्रु.

सावध असणे मोह टाळणे
तारक आत्मज्ञान ! १
 
याविण काही कोठे नाही
टाकुनिया अभिमान ! २
 
माया दुस्तर, भक्ता नच डर
घालवूनि अज्ञान ! ३       

Thursday, September 6, 2012