Sunday, August 19, 2012

कृष्ण कृष्ण म्हण येता जाता, कळेल गीता गाता गाता

कृष्ण कृष्ण म्हण येता जाता,  कळेल गीता गाता गाता



तुझ्या मुखी भगवंताचे नाम असू दे. हातात कर्तव्याचा दीप घेऊन वाटचाल करीत राहा. कृष्णच कर्ता हे अनुभवाने पटेल. नामस्मरणाने चित्त सहजच शुद्ध होऊन जाईल. मनानेच मनाला शिकवत जायचे. श्रीहरीच्या भक्ताला कसली आली आहे चिंता? अभ्यास कर. 

कृष्ण कृष्ण म्हणा येता जाता 
कळेल गीता गाता गाता!१ 

कर्तव्याचा दीप घे करी 
रामकृष्णहरि वदो वैखरी
अभ्यासा नित बसता बसता!१ 

मी, माझे हे सहज जातसे 
तू नि तुझे हे स्फुरण होतसे 
कृष्णच कर्ता कृष्ण करविता!२ 

जे तत्त्वी ते ये व्यवहारी 
प्रसन्न होता श्रीगिरिधारी
पार्थ नि माधव एक तत्त्वत:!३ 

चित्त शुद्ध हो नाम स्मरता 
हरिभक्तांना कसली चिंता 
यज्ञस्वरूप जीवन होता!४ 

मने मनाला शिकवित जावे
मन:शांतिचे सुख सेवावे 
हृदयी श्रीगुरु हे जाणवता!५

No comments: